breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! नवजात बाळाला जिवंत पुरलं, स्मशानभूमीत अचानक आला रडण्याचा आवाज आणि…

लोहरदगा: झारखंडच्या लोहरदगा जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडलेली आहे. येथील एका एका स्मशानभूमीत अज्ञातांनी एका नवजात बाळाला जिवंत पुरले होते. मात्र रात्री अचानक बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि बाळाचे प्राण वाचले आहेत. सध्या हे नवजात सुरक्षित असून, येथील एका कुटुंबाच्या घरी आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कुरू पोलिस स्टेशन परिसरातील आहे. येथील चंदलासो धरणाजवळील स्मशानभूमीत शनिवारी सायंकाळी एक जिवंत नवजात बाळाला पुरण्यात आलेले होते. नवजात बाळाला दफन केल्याची माहिती मिळताच जवळपासचे गावकरी एकत्र आले होते.

असे सांगितले जात आहे की, स्मशानभूमीजवळून जात असताना एका व्यक्तीला बाळाच्या रडण्याचा आवाज आला होता. या व्यक्तीनं घटनास्थळी जाऊन पाहिले तेव्हा एक नवजात बाळ मातीत अर्धे पुरले असल्याचे दिसून आलेले आहे. यानंतर, त्याने नवजात बाळाला सुखरूप बाहरे काढले, आणि डॉक्टरांकडे घेऊन गेला आहे. स्मशानभूमीत नवजात दफन केल्याची माहिती मिळताच कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिरुद्ध मुरारी कुमार घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे कुरू पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिल ओरॉन यांचे म्हणणे आहे, नवजात मुलाचे पालक शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button