breaking-newsपिंपरी / चिंचवड

माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी साधला नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद

पिंपरी ।महाईन्यूज । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाच्या खरबरदारीबाबत मार्गदर्शन केले. प्रभागात या माध्यमातून संवाद साधण्याचा हा पिंपरी-चिंचवड शहरातील पहिलाच उपक्रम ठरला आहे.  

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे एकनाथ पवार यांनी प्रभागातील नागरिकांशी झूम व्हिडिओ कॉम्फरन्सद्वारे संवाद साधत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनी भाजी मंडई, दारूची उघडलेली दुकाने, दैनंदिन आणि इतर विविध समस्या व अडचणी मांडल्या.

प्रत्येक नागरिकांचे पवार यांनी समाधान केले. त्यांना समर्पक व आश्‍वासक उत्तरे दिली. सर्वानी  शासन व महापालिकेच्या नियम व अटींची पालन करून पालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

शहरात प्रथमच एखाद्या लोकप्रतिनिधींने व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून नागरिकांशी अशा प्रकारे संवाद साधला आहे. या उपक्रमांचे नागरिकांनी मनापासून स्वागत करीत, पवार यांचे आभार मानले. या संवादामध्ये ज्येष्ठ नागरिक, मान्यवर, महिला, विद्यार्थी, व्यावसायिक, दुकानदार व नागरिक तसेच, अनिल नेवाळे, धनंजय रिकामे, ऐश्‍वर्या पवार, राम भोसले, विजय सुरवसे आदी सुमारे 200 जणांनी सहभाग घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button