breaking-newsराष्ट्रिय

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी अद्यापही व्हेंटिलेटरवरच, प्रकृतीत सुधारणा नाही

नवी दिल्ली – भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नसून त्यांच्यावर अद्यापही दिल्लीतील लष्कराच्या हॉस्पिटल उपचार सुरू आहेत. त्यांना अजूनही व्हेंटिलटेरवरच ठेवण्यात आलं असल्याची माहिती दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या आर्मी रिसर्च अँण्ड रिसर्च अँण्ड रेफरल रुग्णालयाने दिली.

रुग्णालयाने नुकतेच त्यांच्या प्रकृतीविषयी मेडिकल बुलेटीन जारी केले आहे, त्यानुसार, “प्रणव मुखर्जी यांच्या प्रकृतीत अद्याप काहीही सुधारणा झालेली नाही. ते अद्याप कोमामध्ये असून व्हेटिंलेटर सपोर्टवर आहेत,” अशी माहिती दिल्लीतील लष्कर रुग्णालयाने दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. लष्कराच्या रिसर्च अँड रेफरल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर झालेली ब्रेन सर्जरी यशस्वी ठरल्याची माहिती आहे. मेंदूतील रक्तगाठ (ब्लड क्लॉट) काढण्यासाठी ही शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ‘माझ्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या आठवड्याभरात ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या होत्या, त्या सर्वांना कोरोना चाचणी करुन आयसोलेट करण्याची विनंती करतो’ असं ट्वीट प्रणव मुखर्जी यांनी केलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button