breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांच्या हाताला मिळणार काम

– महिलांना नागरवस्ती विभागाद्वारे मिळणार अनुदान; २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र

– नगरसेविका प्रियांका बारसे यांनी केला पाठपुरावा

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाद्वारे माता रमाई मागासवर्गीय विद्यार्थी कल्याणकारी योजनेअंतर्गत २४ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य प्रियांका बारसे यांनी ही माहिती दिली. त्यासाठी पाठपुरावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच नागरवस्ती विभागाद्वारे विधवा, घटस्फोटित महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय दिले जाते. त्यासाठी ७ महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी चार महिलांना हे अर्थसहाय्य मिळाले आहे. या योजनेसाठी उर्वरितांनाही पात्र करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेविका तथा शिक्षण समिती सदस्य प्रियांका बारसे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास विभागाच्या द्वारे अनेक योजना राबविल्या जात आहेत. या मध्ये विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहु नये, म्हणून माता रमाई मागासवर्गीय विद्यार्थी कल्याणकारी योजना देखील महापालिका राबवत आहे. या वर्षी या योजनेसाठी एकुण ४० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्या योजनेत विद्यार्थी पात्र व्हावेत यासाठी नगरसेविका प्रियांका बारसे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यानुसार या योजनेसाठी अर्ज केलेल्यापैकी २४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांनाही लवकरच शिष्यवृत्ती मिळावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बारसे यांनी सांगितले. या योजनेअंतर्गत ५ वी ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना ४ हजार, तर ८ वी ते १० वी पर्यतच्या विद्यार्थ्यांना ६ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. मागच्या आठवड्यात २४ अर्ज या साठी पात्र झाल्याची माहिती नगरसेविका बारसे यांनी दिली.

नागरवस्ती विभागाद्वारे विधवा, घटस्फोटित महिलांना घरगुती व्यवसाय करण्यासाठी अर्थसहाय दिले जाते. त्यासाठी ७ महिलांनी अर्ज केले होते. त्यापैकी चार महिलांना हे अर्थसहाय्य मिळाले असून नगरसेविका प्रियांका बारसे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती दिली. या योजनेअंर्तगत लाभार्थ्याला प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button