breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाविद्यालयीन पार्किंगमधील दुचाकी चोरणा-या पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी चिंचवड शहरातील महाविद्यालयीन पार्किंगमधील वाहनांची टेळहणी करुन चावी असणा-या टू व्हीलर चोरीचा त्यांचा धंदा बनला होता. मात्र, स्वतःची चैन आणि माैजमजेसाठी गाड्या चोरीचा त्यांचा व्यवसाय झाला होता. त्या चोरलेल्या वाहनाची त्याने विक्री करताना संबंधित चोरट्यास भोसरी पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून तब्बल 33 चोरीचे वाहने हस्तगत करण्यात आली आहे. 

सुभाष आसाराम तौर (वय 25, रा. माऊली कृपा निवास, वडगाव रोड, आळंदी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  यावेळी सहाय्यक आयुक्त सतीश पाटील माहिती देताना म्हणाले की, चोरीची दुचाकी विक्रीसाठी एकजण भोसरीत येणार असल्याची पोलिस हवालदार उत्तम कदम यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा राहून आरोपी सुभाष याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता त्याने सुरुवातीला उडवा-उडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची दुचाकी चोरीची असल्याची कबुली त्याने दिली. त्याच्याकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्याने पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातून तब्बल 33 वाहने चोरल्याचे सांगितले.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अप्पर आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नरेंद्र जाधव, पोलीस निरीक्षक पांडुरंग गोफणे, उपनिरीक्षक प्रमोद कठोरे, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, जी. एन. हिंगे, एस. देवकर एस. एल. रासकर, एस. बी. महाडिक, एस. वाय, भोसले, बी. व्ही. विधाते, व्ही. डी. गाडेकर,  फुले, ए. एम. गोपी सी.एस. साळवे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button