breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या खातेवाटपाचा तिढा सुटेना…नवी खाती निर्माण करण्याची शक्यता…

मुंबई | महाईन्यूज |

महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांचं खातेवाटप अजून झालेलं नाही. त्यात शिवसेनेनं आपल्या खात्यातील मंत्रीपदांवर अपक्ष आमदारांना संधी दिली. त्यामुळेच चांगल्या दर्जाच्या खात्यांसाठी महाराष्ट्र विकास आघाडी सरकार नव्या खात्याची निर्मिती करायच्या विचारात आहे. ही खाती शिवसेनेच्या मंत्र्यांना जाण्याची शक्यता आहे. एकीकडे चांगल्या खात्यांवरुन आणि खातेवाटपावरुन महाविकासआघाडीचा घोळ संपता संपत नाहीये…

शिवसेच्या तीन अपक्षांना मंत्रीपदं मिळाली. आणि यामुळे पक्षातील अनेक जण नाराज झाले. असं असताना काही नवीन खाती निर्माण करण्याच्या विचारात सरकार आहे. मेट्रो रेल्वे, वाणिज्य, तीर्थक्षेत्रं विकास आणि मुख्यमंत्री कार्यालय ही चार नवीन खाती तयार होऊ शकतात. या खात्यांबाबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेच्या वाट्याला नगरविकास, परिवहन, उद्योग, कृषी अशी महत्त्वाची खाती आली आहेत.काँग्रेसच्या वाट्याला महसूल, शालेय शिक्षण, उर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती आली आहेत.तर,राष्ट्रवादीच्या वाट्याला गृह, जलसंपदा, अर्थ अशी महत्त्वाची खाती आली आहेत.

तीन पक्षांच्या सरकारमध्ये खातेवाटप करताना प्रत्येक पक्षाला न्याय द्यायचा प्रयत्न झाला असला तरी पक्षातील नाराजीला वाचा फुटली आहे. शिवसेनेत ही मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. त्यामुळे जर नविन खाती निर्माण केली तर यावर नक्कीच तोडगा निघू शकतो…यामध्ये मेट्रोशी संबंधित खातं बनवलं जाऊ शकतं. कारण सध्या मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर मेट्रोची कामं सुरू आहेत. या निर्मितीदरम्यान प्रकल्पांसाठी एखादं खातही असू शकेल. आणि ही तयारी झालेली खाती ही शिवसेनेसाठी विशेषतः असतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button