breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाराष्ट्र प्रेस क्लब’मध्ये पिंपरी-चिंचवडमधील तरुण पत्रकारांना संधी !

  • दसऱ्याच्या मुहूर्तावर कार्यकारिणीची घोषणा 

पिंपरी / महाईन्यूज

दसरा व विजयादशमीच्या मुहूर्तावर ताथवडेमधील हॉटेल ब्लू वॉटर येथे आज, रविवारी झालेल्या बैठकीत महाराष्ट्र प्रेस क्लब, पिंपरी चिंचवडची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये तरुण पत्रकारांना संधी देण्यात आली आहे. 

या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अमोल शित्रे, उपाध्यक्षपदी मनिषा थोरात- पिसाळ, कार्याध्यक्षपदी गणेश हुंबे, सरचिटणीसपदी अमोल काकडे, कोषाध्यक्ष विकास शिंदे, कार्यकारिणी अमृता ओंबाळे, आणि प्रदीप लोखंडे यांची निवड करण्यात आली. तर, कायदेशीर सल्लागार व मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ पत्रकार तथा विधिज्ञ संजय माने यांच्याकडे कामकाज सोपविण्यात आले. 

पिंपरी-चिंचवड शहरातील पत्रकारांसाठी, तसेच शहराच्या जडणघडणीत सामाजिक दृष्टीने युवा पत्रकारांनी योगदान देणे आवश्यक आहे. हा हेतू समोर ठेवून संस्थात्मक पध्दतीने एकत्र येण्यासाठी महाराष्ट्र प्रेस क्लब, पिंपरी-चिंचवडची स्थापना करण्याबाबत चर्चा सुरू होती. मागील वर्षभरापासून या संदर्भात शहरातील विविध माध्यमात काम करत असलेल्या ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करण्यात आली. कोरोना विषाणूच्या उद्भवलेल्या संकटामुळे संस्थेची स्थापना व कार्यकारिणी जाहीर करण्यास विलंब लागला. अखेर आज दस-याच्या शुभमुहूर्तावर कार्यकारिणी घोषीत करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button