breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्राला काळीमा : नगरमध्ये बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी पती-पत्नीला विवस्त्र करून मारहाण

अहमदनगर | महाईन्यूज

अहमदनगरमध्ये महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बलात्काराची तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेसह पतीला विवस्त्र करून अंगावर पेट्रोल टाकून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार याठिकाणी घडला आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा आरोप पीडित पतीपत्नीने केला आहे.

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामुदायिक अत्याचार झाला होता. त्याची तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याची तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली आहे. नवऱ्याचे वीर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशीही धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांसह 6 आरोपींचा समावेश आहे.

याबाबतची फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकला जात आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गँग रेपसारख्या गंभीर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल झालेले नाही. पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता.

असा घडला प्रकार

24 जानेवारीला पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले. रिक्षामध्ये एक माणूस आधीच बसलेला होता त्याने यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञात स्थळी नेले. त्याठिकाणी एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. पट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. या प्रकारामुळे अहमदनगर जिल्ह्याला धक्का बसला आहे. यातून पोलिसांचा नाकर्तेपणा चव्हाट्यावर आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button