breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

महापौर किशोरी पेडणेकरांची ऑनलाईन भाऊबीज

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनलाईनच ओवाळा आणि ऑनलाईनच ओवाळणी द्या’, असे आवाहन करत भावा-बहिणींनी भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करावी, असे परिपत्रक मुंबई महापालिकेने काढले होते. त्यानुसार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव विचारता घेता ऑनलाईन भाऊबीज साजरी केली.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे मोठे भाऊ सुनील कदम यांचा कोरोनामुळे 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. मात्र कौटुंबिक आघाताला बाजूला सारत मुंबईकरांची दिवाळी सुखात जावी यासाठी सातत्याने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी आज ऑनलाईन भाऊबीज साजरी करताना कोरोनाच्या संकटात काम केलेले शिवसैनिक आणि कोव्हिड योद्धा अशा 21 भाऊरायांना ओवाळले.

‘यंदाच्या दिवाळीत आपल्या भावांशी ऑनलाईन संवाद साधला, तसेच डॉक्टरांचे प्रतिनिधी म्हणून एका डॉक्टरांनासुद्धा भाऊबीजेनिमित्त ओवाळले. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण काही बंधने पाळायला हवीत, फटाके न फोडता महापालिकेच्या आवाहनाला मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिलाय. आता भाऊ-बहिणींनी भाऊबीजही ऑनलाईन साजरी करावी’, असे आवाहन महापौरांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button