breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेतील 57 लिपिकांच्या होणार खातेनिहाय चाैकशी?

– लिपिक पदावरुन लवकरच चतुर्थश्रेणी पदावर पदावतन

– त्या कर्मचा-यांचे धाबे दणाणले, फाैजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून काढण्याची शक्यता?

विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील चतुर्थश्रेणी वर्गातून लिपिक पदावर 117 जणांना पदोन्नती दिली. मात्र, त्या पदोन्नतीतील 55 जणांचे टंकलेखन प्रमाणपत्र बोगस आढळून आले आहे. त्या कर्मचा-यांची खातेनिहाय चाैकशी करण्यात येणार असून त्यात दोषी आढळणा-यांना लिपिकांचे चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनातील सुत्रांनी दिली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थश्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निर्दशनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर त्या कर्मचा-यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे प्राप्त झाली. त्यामुळे सर्वच कर्मचा-याचे प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविली होती.

दरम्यान, त्या कर्मचा-यांचा अहवाल महापालिका प्रशासनास प्राप्त झाला आहे. त्या कर्मचा-याचा अहवालात टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी स्पष्ट माहिती तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाने दिलेली नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने आत्ता पर्यंत परीक्षा मंडळाकडे तीन पत्रे पाठविली आहेत. त्यावर कुठलेही उत्तर त्यांनी दिलेले नाही. त्यामुळे टंकलेखन प्रमाणपत्राची योग्य माहिती न दिल्याने महापालिका प्रशासनाला त्या कर्मचा-यावर कारवाई अडचण निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासन विभागाने पुन्हा राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे. चतुर्थ कर्मचा-यांना दिलेल्या पदोन्नतीत टंकलेखन प्रमाणपत्राची माहिती देण्यास परीक्षा मंडळा उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. परीक्षा मंडळाने स्पष्ट अभिप्राय देवून हे टंकलेखनाचे प्रमाणपत्र वैध की अवैध आहे याविषयी सविस्तर माहिती देण्याची विनंती पत्राद्वारे केलेली आहे. तसेच बोगस प्रमाणपत्र आढळणा-या त्या कर्मचा-यांची खातेनिहाय चाैकशी आदेश देण्यात येणार आहेत. त्यात दोषी आढळणा-या कर्मचा-यांना चतुर्थश्रेणी पदावर पदावतन होण्याची शक्यता आहे.  याशिवाय त्या कर्मचा-यांनी महापालिका प्रशासनाला खोटी माहिती सादर करुन फसवणूक केल्याप्रकणी त्यांच्यावर फाैजदारी गुन्हे दाखल करुन सेवेतून त्यांना काढण्यातही येवू शकते, अशी माहिती सुत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button