breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका शाळेच्या मध्यान्ह भोजनात ‘उंदराच्या लेंड्या’ विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

महानगरपालिकेच्या काळभोर येथील माध्यमिक शाळेत आठवीच्या वर्गात शिकणा-या विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात उंदराच्या लेंड्या आढळून आल्या आहेत. ठेकेदारांमार्फत दिल्या जाणा-या भोजनात लेंड्या सापडल्याने एकच खळबळ उडाली असून तब्बल 80 विद्यार्थ्यांच्या जिविताशी खेळ सुरु आहे. विशेष म्हणजे मोरया गोसावी महिला बचत गटाला मध्यान्ह भोजनाचा ठेका असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या काळभोरनगर माध्यमिक शाळेत 87 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन व्यवस्था करण्यात येते. पालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांना मध्यान्ह भोजन व्यवस्था पुरण्यासाठी इस्काॅन आणि काही महिला बचत गटांना हा ठेका देण्यात आलेला आहे. त्यातील काळभोरनगर शाळेला मध्यान्ह भोजन व्यवस्था पुरवण्याचे काम हे महिला बचत गटांकडे दिलेले आहे.

महापालिकेच्या मध्यान्ह भोजन व्यवस्था पुरण्याचे संपुर्ण काम हे इस्काॅन संस्थेकडे होते. परंतू, भाजपची सत्ता आल्याने त्या कामकाजाचे वाटप करण्यात आले. त्यातील भाजप नगरसेविकेने जवळपास 30 ते 35 शाळांचे काम हे स्वताःच्या महिला बचत गटांकडे घेतलेले आहे. तर शहरातील अन्य महिला बचत गटांकडे ते दिलेले आहे. काळभोरनगर माध्यमिक आठवीच्या वर्गात मध्यान्ह भोजनात उंदराच्या लेंड्या आढळून आल्याने ते काम मोरया गोसावी महिला बचत गटाकडे असून त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याबाबत राष्ट्र्वादी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष व नगरसेविका वैशाली काळभोर, नगरसेविका सुलक्षणा धर यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर, शिक्षण प्रशासन अधिकारी ज्योस्ना शिंदे यांच्याकडे तक्रार केली आहे. त्या घटनेची सखोल चाैकशी करुन ठेकेदार महिला बचत गटावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच शिक्षण समिती सभापती मनिषा पवार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित मोरया गोसावी महिला बचत गटाला तत्काळ नोटीस काढून चाैकशी अहवाल मागवण्याची सुचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button