breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका मुख्य इमारतीतील व्यायामशाळा स्थलांतरित करण्यास विरोध

विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे आयुक्तांना पत्र

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारत तळमजळ्यावरील व्यायाम शाळा स्थलातंरित करण्याचा डाव सत्ताधारी भाजप पदाधिका-यांनी आखला आहे. त्याठिकाणी पालिकेचा संपुर्ण डाटा डिजीटल स्टोअर करणा-या ठेकेदाराला जागा दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजानंतर दररोज व्यायाम करणा-या अधिकारी-कर्मचा-यांना अन्याय होत असून व्यायामशाळा स्थलातंरित केल्यास तीव्र आंदोलन करु, असा इशारा विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी दिला.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले. त्यात म्हटले आहे की,  महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून पालिका स्थापनेपासून व्यायामशाळा कार्यरत आहे. मुख्यालयातील या व्यायामशाळेमध्ये मनपाचे बहुसंख्य कर्मचारी सकाळी लवकर व संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर व्यायाम, योगासने करत असतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या शारिरीक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे. ही बाब मनपाच्या दृष्टीने लाभदायक आहे. सद्यस्थितीमध्ये या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक सोई सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु सदर व्यायामशाळेचे स्थलांतर प्रस्तावित असल्याचे समजते.

मनपाचा संपूर्ण डेटा डिजीटल स्टोअर करण्याकरीता निविदा काढण्यात आलेली आहे. या निविदाचे काम  सदर व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन ती जागा संबंधित ठेकेदारास देण्याचे नियोजन आहे. व सदरचा ठेका भाजपाच्या एका नगरसदस्याच्या एका निकटवर्तीने घेतल्याचे समजते. त्यामुळे सदर व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन कर्मचा-यांची गैरसोय होणार आहे. सदरचा प्रकार गंभीर असून केवळ भाजप नगरसदस्याच्या निकटवर्तीय ठेकेदाराची सोय म्हणून हि व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन मनपा         कर्मचा-यांवर अन्याय होणार आहे.

मनपा कर्मचा-यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी व्यायाम शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात येऊ नये. उलट मनपाच्या इतर व्यायाम शाळेसारखे या व्यायाम शाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात यावीत. या व्यायामशाळा स्थलांतरणास राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे सदरचे स्थलांतरण रद्द करण्यात यावे. अन्यथा राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षामार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button