breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षात सातवा वेतन आयोग लागू करु – अजित पवार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी-कर्मचा-यांना नवीन वर्षात सातवा वेतन आयोग लागू केला जाईल. त्या प्रश्नाकडे मी स्वतः लक्ष घतले असून कर्मचा-यांना फरकांच्या रकमाही टप्प्याने देण्यात येतील, असा विश्वास अजित पवार यांनी दिला.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आकुर्डीतील पक्षाच्या कार्यक्रमात महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे बबनराव झिंजुर्डे आणि सहका-यांनी भेट घेतली. त्यांना निवेदन देवून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना लवकर 7 वा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, माजी महापौर वैशाली घोडेकर, मंगला कदम, योगेश बहल, नगरसदस्य प्रशांत शितोळे, समिर मासुरळकर, शमिन पठाण, मयुर कलाटे, वैशाली काळभोर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर आदी पदाधिकारी उपस्थित होते

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कर्मचा-यांना सातवा वेतन लागू करण्याबाबतच्या प्रस्तावाला महासभा, स्थायी समितीने मान्यता दिली आहे. परंतु, राज्य सरकारकडे तो प्रस्ताव रखडला आहे. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, आता कोणीही येईल आणि आम्ही सातव्या वेतन आयोगाचा प्रश्न सोडवू असे सांगतील. परंतु, हा प्रश्न शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच सोडविणार आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मी लक्ष घातले आहे. त्यानुसार आयोग लागू केला जाईल. महापालिका कर्मचा-यांना नवीन वर्षाची भेट दिली जाईल. त्यासाठी सर्वस्व पणाला लावेल. परंतु, आयोग लागू झाल्यावर कर्मचा-यांनीही जबाबदारीचे भान ठेऊन काम करावे. नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवाव्यात, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button