breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूजचे’ वृत्त तंतोतंत खरे : पिंपरी- चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती !

– आयुक्त श्रावण हर्डीकर ‌यांची आयजीआर मधे नोंदणी महानिरीक्षक पदी पुणे येथे बदली

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती झाली आहे. ‘महाईन्यूज’ने या बाबत या पुर्वी सविस्तर वृत्त दिले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर ‌यांची आयजीआर मधे नोंदणी महानिरीक्षक पदी पुणे येथे बदली झाली आहे.

ओडिशामध्ये प्रशासकीय सेवेत उल्लेखनीय काम करणारे राजेश पाटील २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली आहे. त्यानंतर केंद्र सरकारच्या स्कील इंडिया उपक्रमांतर्गत त्यांनी काम पाहिले आहे. दरम्यान, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तपदी नियुक्त करण्यात येईल, अशी चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र, राजेश पाटील यांचे नाव नंतर आघाडीवर आले. राजेश पाटील हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदी राजेश पाटील यांची नियुक्ती या मथळ्याखाली महाईन्यूज’ने या बाबत या पुर्वी सविस्तर वृत्त दिले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे.

राजेश पाटील यांचा थोडक्यात आढावा…
स्टॅटेस्टिकल सर्व्हिसेसमध्ये राजेश यांची निवड झाली होती. पण, त्यांना आयएएस अधिकारीच व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी आपली मेहनत सोडली नाही. २००५मध्ये ते यूपीएससी पास झाले आणि त्यांची पहिली नियुक्ती ओडिशातील कोटापूरमध्ये अठगढ येथे विभागीय न्यायदंडाधिकारी म्हणून झाली. ओडिशामध्ये काम करताना २००८मध्ये महा नदीला पूर आला होता. त्यावेळच्या बचाव कार्यात राजेश पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. राजेश यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राजेश यांनी आत्मचरित्रपर पुस्तकाचे लेखन केले असून, ‘ताई मी कलेक्टर व्हयनू’ हे त्यांचे पुस्तक खूप लोकप्रिय आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button