breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मराठा क्रांती मोर्चाचा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवर बहिष्कार


मुंबई – अनेक मराठा मोर्चे निघूनही अद्याप मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत मराठा आरक्षण देता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने यंदा वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया आणि नोकरभरतीकरता मराठा आरक्षण लागू करता येणार नाही. मराठा समाजातील बांधवांच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या व्हिडिओ कॉन्फनन्सला मराठा क्रांती मोर्चाने बहिष्कार घातला आहे.

मराठा क्रांती मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. मराठा आरक्षणाला मुख्यमंत्री आणि उपसमितीने फार गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळेच हे आरक्षण न्यायालयात टीकू शकलं नाही. म्हणून मराठा क्रांती मोर्चाकडून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला बहिष्कार घालण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button