breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट वारीतील वारक-यांची तहान भागवणार, पंढपूरपर्यंत टँकर सेवा

  • सामाजिक कार्यकर्ते अरुण पवार यांच्यातर्फे मोफत सेवा
  • पालखी सोहळ्यातील चार दिंड्यांना सेवा पुरविणार

पिंपरी, (महाईन्यूज) – संत ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्या दरम्यान वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पालखी सोहळ्यातील दिंड्यांसाठी चार पाण्याचे टँकर देण्यात येत आहेत. हे टँकर संपूर्ण पालखीमार्गात पंढरपूरपर्यंत चार दिंड्यांना मोफत पाणी पुरवठा करणार आहेत, अशी माहिती मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार यांनी दिली.

  • पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ संचलित मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे ही सेवा देहू-आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण पालखी मार्गावर देण्यात येणार आहे. टँकरचे पूजन करून वारकऱ्यांच्या सेवेत दाखल करण्यात आले. या टँकरद्वारे जगद्‌गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील प.पू.श्री. रामकृष्ण प्रासादिक दिंडी क्र. 221, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी समाज, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. सोपान काका कराडकर दिंडी क्र ११ आणि ह.भ.प. मठाधिपती मुक्‍ताबाई महाराज बेलगावकर दिंडी क्र. 59 अशा चार दिंड्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येणार आहे.

पुणे वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक संजय मारणे, ह.भ.प. माऊली कोकाटे महाराज, दत्त सेवा आश्रमाचे ह.भ.प. शिवानंद महाराज, ह.भ.प. तांदळे महाराज, ह.भ.प.काळे महाराज, शिव कीर्तनकार इतिहासकार डॉ. गजानन व्हावळ, समाज प्रबोधनकार शारदा मुंडे, भंडारा डोंगर ट्रस्टचे सदस्य जगन्नाथ नाटक पाटील, मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण पवार, सूर्यकांत वाघमारे, ह.भ.प. तुकाराम महाराज, सेवानिवृत्त वनपरिमंडल अधिकारी रमेश जाधव, विश्व हिंदु परिषद,पश्चिम महा.प्रांत सेवा प्रमुख दादा ढव्हाणे, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे यांच्या हस्ते टँकरचे पूजन करून टँकर रवाना करण्यात आले.

  • अरुण पवार म्हणाले, वारकऱ्यांना वारीत पिण्यासाठी पाणी मिळत नाही. यंदा तर दुष्काळी परिस्थिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टतर्फे टँकर सुविधा उपलब्ध करून दिली जाते. हीच पांडुरंगचरणी आमची सेवा आहे.

जगन्नाथ नाटक पाटील म्हणाले, सिमेंटच्या जंगलामुळे पक्षी गायब झाले आहेत. परिणामी पर्यावरण बिघडत चालले आहे. झाडे लावण्यासाठी जागा लागते. आम्ही अरुण पवार यांना झाडे लावण्यासाठी जागा उपलब्ध करून देणार आहोत. वारकऱ्यांसाठी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य कौतुकास्पद आहे.

  • डॉ. गजानन वाव्हळ म्हणाले, जगाचा आरसा ही वेडी माणसेच असतात, पवार याच पंक्तीत बसतात. अशी माणसे वारकरी संप्रदायाला लाभली, तर भारत महासत्ता नक्की होईल. वारकरी धर्म टिकला पाहिजे, या दृष्टीने मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट करीत असलेले कार्य महत्त्वाचे आहे. लहान मुलांना संतांच्या पालख्या दाखविल्या पाहिजेत. आपली संस्कृती जपली पाहिजे.

शिवानंद महाराज म्हणाले, एक व्यक्ती काही करू शकत नाही, सर्वांचे सहकार्य असेल, तर त्या कार्याला विस्तृत स्वरूप मिळते. अरुण पवार यांची सेवा निस्वार्थी व मनोभावे सुरू आहे. शारदा मुंडे म्हणाल्या, वृक्षारोपण करून समाजाला प्राणवायू पुरविण्याचे काम अरुण पवार करीत आहेत.

  • यावेळी भिष्माचार्य ज्येष्ठ नागरीक संघ, संत गाडगेबाबा सेवा संघ, भैरवनाथ ज्येष्ठ नागरीक संघाचे पदाधिकारी, मानवी हक्क संरक्षण समितीचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, अजीज सिद्दीकी, अमोल लोंढे, शंकर तांबे, डॉ.दिनेश गाडेकर, संतोष माने, युवराज गोसावी, सुनील भोसले, बालाजी पांचाळ, माधव मनोरे, प्रा.संपत गर्जे, नामदेव पवार, मल्हारराव येळवे, जालंदर दाते, प्रकाश बंडेवार, नारायण दळवी आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय धोंडगे यांनी केले. तर, आभार सूर्यकांत कुरुलकर यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button