breaking-newsराष्ट्रिय

मध्यप्रदेशात कॉंग्रेसचा बसपाशी आघाडीचा प्रयत्न

भोपाळ – मध्यप्रदेशात बहुजन समाज पक्षाशी आघाडी करण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने चालवला आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले असले तरी अद्याप निर्णय झालेला नाही पण बहुधा हा निर्णय लवकरच होईल अशी कॉंग्रेसला अपेक्षा आहे. या राज्यात बहुजन समाज पक्षाने गेल्या 20 वर्षांपासून सतत किमान 7 टक्के मते मिळाली आहेत.

कॉंग्रेसलाही या राज्यात सरासरी 36 टक्के मते मिळत असतात. या दोन्ही मतांची बेरीज 45 टक्‍क्‍यांपर्यंत जात असल्याने पक्षाला विजय मिळणे सुकर होईल असा कॉंग्रेस नेत्यांचा अंदाज आहे. राज्यात गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता असून या सरकारला लोक कंटाळले असल्याचा प्राथमिक अनुमान आहे. त्यामुळे येथे राजकीय लाभ घेण्यासाठी आतुर असलेल्या कॉंग्रेसला कोणतीही रिस्क घ्यायची नसल्यानेच त्यांनी आता येथे बहुजन समाज पक्षाशी युती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

कर्नाटकात जेडीएस पक्षाने बहुजन समाज पक्षाशी युती केल्याने त्यांना तेथे चांगला लाभ झाला आहे. त्याचीच पुनरावृत्त मध्यप्रदेशसह राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये, करण्याचा कॉंग्रेसचा इरादा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button