breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘मतदानावर पावसाचे सावट’, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अन्य भागांमध्ये कोसळधार

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. रविवारी (दि. 20) सायंकाळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे पुणे-बंगळुरू महामार्गावरून पुण्याकडून सातारा, कोल्हापूरकडं जाणारी वाहतुक मंदावली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचा परिणाम पडण्याची शक्यता आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. त्यात उद्या सोमवारी (दि. २१) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यात पाऊसामुळे व्यत्यय येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे मतदानाच्या टक्केवारीलाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. अशातच जास्तीत जास्त मतदान करून घेणं हे उमेदवारांसमोर आव्हान असणार आहे. साताऱ्यात निवडणूक कर्मचाऱ्यांना पावसामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे.

रविवारी सायंकाळी पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरीसह राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. साताऱ्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कोल्हापुरात सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले आहे. रत्नागिरीमध्येही पावसाने जोर पकडला आहे. पुण्यातही कालपासून पाऊस होत आहे. रविवारी सायंकाळी पाऊस पडायला सुरूवात झाली आहे. मुंबई वेधशाळेने पुणे, मुंबईसह राज्यातील विविध भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button