breaking-newsमनोरंजन

‘मखणा’ गाण्यामुळे हनी सिंग विरोधात गुन्हा दाखल

गेल्या काही दिवसांपासून रॅपर व गायक हनी सिंगचा ‘मखणा’ हा म्युझिक व्हिडीओ वादात सापडला आहे. या रॅपमध्ये महिलांबाबत अशोभनीय व आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप हनी सिंगवर करण्यात आला. पंजाबच्या महिला आयोगाने या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली होती.

हनी सिंगच्या विरोधात भादंवि कलम २९४ (अश्लील वर्तन), कलम ५०९ (महिलांसाठी अवमानकारक वर्तन) आणि आयटी अँक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे मोहालीचे वरिष्ठ पोलिस अधीक्षक हरचरण सिंग भुलार यांनी सांगितले आहे.

पंजाबच्या महिला आयोगाच्या मनीषा गुलाटी यांनी हनी सिंगच्या गाण्याविरोधात FIR दाखल करण्याची मागणी केली होती. मनीषा यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून १२ जुलैपर्यंत याबाबतचा अहवाल मागितला होता.

‘हनी सिंगच्या रॅपमध्ये महिलांविषयी अशोभनीय भाषा वापरली आहे. त्यामुळे हनी सिंग व संबंधित कंपनी अर्थात टी-सीरिजचे भूषण कुमार यांच्याविरोधात कारवाई करण्यात यावी. तसंच या गाण्यावर बंदी घालण्यात यावी,’ अशी मागणी मनीषा यांनी केली होती.

अमली पदार्थांच्या आहारी गेल्यामुळे हनी सिंग गेल्या काही वर्षांपासून इंडस्ट्रीतून गायब असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यानंतर त्याने ‘मखना’ या म्युझिक व्हिडीओद्वारे इंडस्ट्रीत पुनरागमन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button