breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेत नाराजी, रामदास कदम शिवसेना नेते पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा

मुंबई | महाईन्यूज |

‘ठाकरे’ सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तिन्ही पक्षांतील एक एक नाराज चेहेरे समोर यायला सुरवात झाली आहे . शिवसेनेतही मंत्रिमंडळ विस्तारानंतर मोठी नाराजी पाहायला मिळत आहे. मंत्रिमंडळात समावेश न झाल्याने शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे. रामदास कदम शिवसेनेच्या नेते पदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याचंही बोललं जात आहे.

रामदास कदम शिवसेनेतील मोठे नेते असून त्यांच्याकडे मंत्रीपदाचा अनुभव आहे. मात्र विश्वासात न घेता नव्या मंत्रिमंडळातून डावलल्याने ते नाराज आहेत, अशी चर्चा आहे. रामदास कदम यांच्याप्रमाणे शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आलं आहे . शिवसेनेतील दिवाकर रावते, दीपक केसरकर, रवींद्र वायकर, प्रताप सारनाईक, तानाजी सावंत, सुनील प्रभू, भास्कर जाधव या नेत्यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते नाराज असल्याची चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button