breaking-newsमुंबई

मंत्रिमंडळ बैठकीपेक्षा कोणते काम महत्त्वाचे?

  • बेशिस्त मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांच्या कानपिचक्या; उशिरा येणाऱ्यांना बैठकीचे दरवाजे बंद

मंत्रिमंडळ बैठक हे आपले घटनात्मक काम असून यापेक्षा कोणतेही महत्वाचे काम असूच शकत नाही. कार्यकर्त्यांचा वाढदिवस, मतदार संघात महत्त्वाचे काम होते अशा सबबी सांगू नका. यापुढच्या बैठकींना वेळेवर उपस्थित न राहणाऱ्यांना दरवाजे बंद करावे लागतील अशा  शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांना खडसावल्याचे विश्वसनीय सूत्रांना सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आलेला असतानाच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेल्या या नाराजीमुळे मंत्रिमंडळात विशेषत: भाजपच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

सरकारमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीला अनन्य साधारण महत्व असते. याच बैठकीमध्ये राज्याच्या विकासाच्या योजना, सरकारची ध्येय  धोरणे ठरतात. अलिकडच्या काळात मात्र मंत्रीच या बैठकांना फारसे गांभिर्याने घेत नसल्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या काळात मंत्रीमंडळ बैठक सुरू होताच सभागृहाचे दरवाजे बंद केले जायचे, त्यामुळे विलंबाने येणाऱ्या मंत्र्यांना आत प्रवेश दिला जात नसे. मनोहर जोशी यांच्या काळातही सकाळी लवकर होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीला झाडून सगळे मंत्री वेळेवर  उपस्थित असायचे. मात्र आजकाल मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे अनेक मंत्री पाठ फिरवतात. अनेक वेळा बैठक सुरू झाल्यानंतरही काही मंत्री हजेरी लावतात. मुख्यमंत्र्यांकडून कधी विचारणा झालीच तर मतदार संघात महत्वाचा कार्यक्रम किंवा कार्यकर्त्यांचा वाढदिवस होता. त्यामुळे वेळेवर पोहोचता आले नाही. अशा सबबी सांगून वेळ मारून नेली जाते. शिवसेनेचे मंत्री मात्र मंत्रिमंडळ बैठकीबाबत कमालीचे सतर्क असतात. बैठकीला येता येत नसेल तर मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून  पूर्व कल्पना देतात. एवढेच नव्हे तर विलंब होणार असेल तरी मुख्यमंत्र्यांना पूर्व कल्पना देऊन त्यांची परवानगी घेतात. भाजप मंत्री मात्र मुख्यमंत्री आपलेच आहेत अशा अविर्भावात वागत असतात. याबाबत कधी स्पष्ट तर कधी सूचक नाराजी व्यक्त करूनही गेल्या साडे तीन वर्षांत काही मंत्र्यांच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या मुख्यमंत्र्यांनी बुधवारच्या मंत्रिमडळ बैठकीत उघडपणे आपल्या सहकाऱ्यांना खडे बोल सुनावल्याचे समजते. मंत्रीमंडळ बैठक ही आपली प्रमुख जबाबदारी असून त्यापेक्षा अन्य कसलेही महत्वाचे असू शकत नाही. यापुढे अशा सबबी खपवून घेतल्या जाणार नाहीत. बैठकीस वेळेवर आला नाहीत तर दरवाजे बंद करावे लागतील असा सूचन इशाराही त्यांनी दिल्याचे कळते. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्यामुळे लेटकमर आणि दांडीबहाद्दर मंत्र्यामध्ये अस्वस्थतता आहे. मंत्रीमंडळ बैठकीत अनेक  विषय चर्चेशिवायच मंजूर होतात. काही काही विषय बैठकीत येईपर्यंत मंत्र्यांनाच माहित नसतात. कधी कधी तर अध्र्या तासातच बैठत संपते. या नाराजीतून मंत्रिमंडळ बैठकीकडे काही मंत्री पाठ फिरवत असावेत असा सूर एका मंत्र्याने लावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button