breaking-newsआंतरराष्टीय

भ्रष्टाचार भोवला, पाकचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना ७ वर्षांचा कारावास

पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोषी ठरवले आहे. इस्लामाबाद येथील न्यायालयाने ६८ वर्षीय शरीफ यांना अल अजीजिया प्रकरणात दोषी ठरवत ७ वर्षांची शिक्षा सुनावली. तर फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याशिवाय त्यांना २.५ मिलियन डॉलरच्या दंडाची शिक्षाही सुनावली आहे. दुसऱ्या एका घोटाळ्याप्रकरणी कारागृहात आहेत.

ANI

@ANI

Pakistan Media: Former Pakistan PM Nawaz Sharif sentenced to 7 years in jail in NAB reference case, acquitted in flagship reference case.

३४ लोक याविषयी बोलत आहेत

‘द डॉन’च्या वृत्तानुसार, निर्णय ऐकण्यासाठी नवाझ शरीफ स्वत: न्यायालयात उपस्थित होते. न्या. अर्शद मलिक यांनी नवाझ शरीफ न्यायालयात येताच काही क्षणातच निकाल घोषित केला. फ्लॅगशिप इन्व्हेस्टमेंट प्रकरणात आरोपीविरोधात कोणत्याही प्रकारचा खटला दाखल करता येऊ शकत नाही. मात्र, अजीजिया प्रकरणात ते दोषी असल्याचे न्यायालयाने म्हटले.

राजकीय वनवास भोगत असलेल्या शरीफ यांच्या समर्थकांनी न्यायालयाबाहेर मोठी गर्दी केली होती. माध्यमात आलेल्या वृत्तानुसार, निकाल ऐकताना शरीफ अत्यंत शांत दिसले. या निर्णयाविरोधात आव्हान देण्याचा पर्याय शरीफ यांच्याकडे आहे.

न्यायालयाबाहेर तैनात पोलीस आणि शरीफ समर्थकांमध्ये जुंपली होती. समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडाव्या लागल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button