breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

भोसरीच्या ‘इंद्रायणीथडी’ जत्रेत ‘नमो फिर से’चा नारा

  • आमदार महेश लांडगे व माजी महापाैर नितीन काळजे यांच्याकडून ‘टी शर्ट’चे लाॅचिंग

पिंपरी ( महा ई न्यूज ) – भोसरीच्या इंद्रायणीथडी जत्रेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार ब्रॅडींग केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्वसामान्य नागरिकांच्या  घराघरात पोहोचविण्यासाठी मोदीची प्रतिमा असलेल्या टी शर्ट द्वारे ‘नमो फिर से’चा नारा दिला आहे. यातून खरचं बचत गटातील महिलांचे सक्षमीकरण करायचे की, 2019 च्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची ही पुर्वतयारी आहे, असा प्रश्न सुज्ञ नागरिकांना पडला आहे. 

भोसरी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार तथा भाजपचे सहयोगी सदस्य महेश लांडगे यांनी ‘व्हिजन 20-20’, सायक्लोथाॅन, वाढदिवसांचे जोरदार ब्रॅडिंग केले. प्रत्येकवेळी वेगळी शक्कल लढवून ‘इव्हेंट मॅनेंजमेंट’ मधून त्यानी स्वताःसाठी प्रतिमा निर्मितीचा प्रयत्न केला. तसेच इंद्रायणीथडी जत्रेच्या माध्यमातून भाजपाचे कमळ प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्या भोसरीतील गावजत्रा मैदानावर आजपासून (शनिवार) इंद्रायणीथडी जत्रा भरली आहे. त्यातील एका स्टाॅलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिमा असलेले टी शर्ट ठेवण्यात आले आहेत. त्या प्रत्येक टी शर्टवर ‘नमो फिरसे’ संदेश दिला आहे. तसेच इंद्रायणीथडी जत्रेतील स्वयंसेवकांना दिले जाणार आहेत. त्यामुळे इंद्रायणीथडी जत्रेतून कोट्यावधी रुपये खर्चून भाजपचा प्रसार आणि प्रचार सुुरु आहे.

आमदार महेश लांडगे व माजी महापाैर नितीन काळजे यांनी त्या स्टाॅलला भेट दिली. त्या मोदींची प्रतिमा असलेल्या टी शर्टचे लाॅंचिग केले. ते फोटो सोशल मिडियातून सकाळपासून व्हायरल झाले आहेत. त्या टी शर्टवर ‘नमो फिर से’ असा नारा दिल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकींच्या पुर्वतयारीचे जोरदार ब्रॅंडिंगचे सुुरु असल्याचे दिसून येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button