breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

Maratha Reservation: मराठा समाजाला EWSमध्ये आरक्षण देण्याच्या निर्णयाचे स्वागत – विनायक मेटे

मुंबई – मराठा समाजाला EWS मध्ये आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. काही स्तरांतून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणावर राज्य सरकार गंभीर नसल्याची टीका वारंवार शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे करत होते. मात्र, यावेळी राज्य सरकारच्या या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले आहे. “मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतल्याबद्दल तात्पुरते का होईना मात्र विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे तसेच लवकरच शालेय प्रवेश आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे याबद्दल आम्ही राज्य सरकारचे स्वागत करतो”, असे वक्तव्य मराठा समाजाचे नेते विनायक मेटे यांनी केले आहे.

वाचा :-सावित्रीजोती’ मालिका बंद करू नका; ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

काय आहे सरकारचा निर्णय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थी आणि उमेदवारांची होणारी फरफट लक्षात घेऊन ठोस पाऊल टाकण्यात आले. SEBC उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचे (ईडब्ल्यूएस)आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरती यासाठी होण्याकरिता ईडब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयावर बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. मराठा समाजासाठी हा खूप मोठा दिलासा ठरणार आहे.

सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात किंवा ईडब्ल्यूएस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल, उमेदवाराने शैक्षणिक प्रवेशातील किंवा शासन सेवेत भरतीकरिता ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार एसईबीसी आरक्षणाच्या लाभास पात्र ठरणार नाही, ईडब्ल्यएस प्रमाणपत्र देतांना एसईबीसी उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता याआधारे राज्य शासनाने विहित केलेले निकष लावण्यात येतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button