breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भावंडांमध्ये मिळकतीचा वाद; माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांचा आत्मदहनाचा इशारा

  • शाळेसमोर लावला अनधिकृत नोटीस बोर्ड
  • विद्यार्थी, पालक वर्गात भितीचे वातावरण
  • संस्थापक, शिक्षक, पालकांना होतोय मनस्ताप

पिंपरी – शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळ संचलित शाळेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक मच्छिंद्र तापकीर यांच्या भावंडांमध्ये मिळकतीवरून वाद निर्माण झाला आहे. विद्यार्थी आणि पालकांना भयभीत करण्यासाठी शाळेसमोर आक्षेपार्ह नोटीस लावली आहे. जूनमध्ये शाळा प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आल्यास संस्था जबाबदार राहणार नाही, असा नोटीस बोर्ड शाळेसमोर लावला आहे. पालिकेने हा अनधिकृत बोर्ड हटवावा, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा संस्थापक अध्यक्ष तापकीर यांनी दिला आहे.

यासंदर्भात महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात तापकीर यांनी म्हटले आहे की, तापकीरनगर येथील शिवतेज क्रीडा व शिक्षण मंडळांतर्गत कै. श्री. भाऊसाहेब तापकीर प्राथमिक विद्यामंदीर आणि श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालयाची 25 वर्षापूर्वी स्थापना करण्यात आली. ही शाळा भाऊसाहेब गंगाराम तापकीर यांच्या काळेवाडी सर्व्हे नंबर 68/2/1 येथील मिळकतीवर आहे. तर, राजाराम भाऊसाहेब तापकीर, मल्हारी भाऊसाहेब तापकीर, मोहन भाऊसाहेब तापकीर आणि मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर हे वारसदार आहेत. भाऊसाहेब तापकीर यांनी सर्व्हे क्रमांक 62/2/1 या भूखंडावरील शाळेची इमारत शिवतेज क्रिडा व शिक्षण मंडळाला विद्यार्थ्यांच्या हितासाठी ताबे वहिवाटीने दिली.

संस्थेचे कामकाज वारसदार सचिव मल्हारी भाऊसाहेब तापकीर पाहात होते. त्यांच्या कार्यकाळात संस्थेत अनागोंदी कारभार झाला. त्यामुळे संस्थेने मल्हारी तापकीर यांना संस्थेच्या ठरावानुसार सचिव पदावरून कार्यमुक्त केले. त्यामुळे मिळकतीचा वाद उपस्थित करून मल्हारी तापकीर यांच्याकडून शाळेच्या शैक्षणिक कामकाजात अडथळे निर्माण केले आहेत. संस्थापक, शिक्षक, पालकांना मानसिक त्रास दिला जात आहे, असे तापकीर यांनी निवेदनात म्हटले आहे.

शाळेसमोर अनधिकृत नोटीस बोर्ड लावला आहे. त्यावर शाळेत प्रवेश घेणा-या पालकांना भयभीत करणा-या सूचना दर्षविल्या आहेत. शाळेतील कर्मचा-यांना धमकी दिली जात आहे. त्यामुळे शाळेत शिकणा-या तीन हजार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. तरी, शिक्षण मंडळाने दखल घेऊन यावर मार्ग काढावा. तसेच, पालिकेने शाळेसमोरील अनधिकृत नोटीस बोर्ड तातडीने हटवावा, अन्यथा पालिकेसमोर आत्मदहन करणार आहे, असा इशारा संस्थापक अध्यक्ष तापकीर यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button