breaking-newsआंतरराष्टीय

भारत-पाक सीमेवर पुन्हा तीन ड्रोन

  • सीमा सुरक्षा दल आणि पंजाब पोलीस सतर्क

फिरोझपूर : पंजाबमधील हुसेनीवाला भागात तैनात केलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना भारत -पाकिस्तान सीमेवर तीन ड्रोन दिसले आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरु वारी सांगितले.

सीमा सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या बाजूने येणाऱ्या ड्रोनवर सोमवारी गोळीबार केल्याच्या बातम्या असल्या तरी त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही.

या महिन्याच्या सुरुवातीला बस्तीराम लाल, तेंडीवाला व हाजरा सिंग वाला या खेडय़ांमध्ये राहणाऱ्या लोकांना ड्रोन दिसले होते. त्यानंतर सीमा सुरक्षा दलास सतर्क करण्यात आले आहे. यावेळी सीमा सुरक्षा दल व पंजाब पोलिसांनी तपास मोहीम सुरू केली पण त्यात काहीच संशयास्पद आढळून आले नाही.

सीमा सुरक्षा दलाने सीमा भागात राहणाऱ्या नागरिकांना पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनबाबत सतर्क केले असून त्याबाबत माहिती दिली आहे.

पाकिस्तानची ड्रोन विमाने दिसल्यास लगेच पोलीस किंवा सीमा सुरक्षा दलांना माहिती देण्यास सांगण्यात आले आहे. पाकिस्तान पंजाब प्रांतात ड्रोन विमाने पाठवून त्यामाध्यमातून शस्त्रे भारतात येत आहेत व नंतर ती शस्त्रे काश्मीरमध्ये पाठवली जातात असा आतापर्यंतचा संशय आहे. पाकिस्तानची ड्रोन विमाने दिसल्याच्या अनेक घटना यापूर्वीही घडल्या आहेत. काश्मीरमध्ये कलम ३७० काढून घेतल्यानंतर तेथे शिरकाव करणे मुश्कील असल्याने आता पाकिस्तानने सीमेवरून पंजाबमध्ये ड्रोन विमाने पाठवण्याची नवी युक्ती वापरली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button