breaking-newsराष्ट्रिय

भारत-अमेरिका 2+2 संवाद रचनात्मक आणि सकारात्मक

  • संरक्षणमंत्री निर्मला सितारामन

नवी दिल्ली – भारत-अमेरिका 2+2 संवाद रचनात्मक आणि सकारात्मक झाल्याचे संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. बैठकीनंतर जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी अमेरिकेचे संरक्षणमंत्री जेम्स मेट्टीस आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री माईक पॉम्पेओ यांचे आभार मानले.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

Ken Juster

@USAmbIndia

We welcome the signing of the Communications Compatibility and Security Agreement between U.S. and India. This agreement takes partnership to new heights! 🇺🇸🇮🇳

भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ संबंध भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत शांतता आणि स्थैर्य सुनिश्‍चित करण्यासाठी सहकार्य करण्याचा पुनरुच्चार केल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही देशांचा आर्थिक विकास, समृद्धी आणि प्रगती साध्य करतानाच दोन्ही देशांमधील नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यावरही या बैठकीत भर देण्यात आला आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीत, संरक्षणविषयक सहकार्याचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button