breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय संघाची घोषणा, हरमनप्रीत कौरकडे नेतृत्व

भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे आगामी महिला टी-२० विश्वचषकाच्या भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने रविवारी १५ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. बंगालची तडाखेबाज फलंदाज रिचा घोष हा भारतीय संघातला एकमेव नवीन चेहरा असून, २१ फेब्रुवारीला भारतीय महिला संघ सिडनीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहेत.

याव्यतिरीक्त स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शेफाली वर्मालाही भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं आहे. या स्पर्धेसाठी भारतीय महिलांची अ गटात निवड झाली असून त्यांच्यासमोर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेश यांचं मोठे आव्हान असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button