breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भारतीय उद्योगपती धनंजय दातार ‘फोर्ब्ज’च्या यादीत

मुंबई :  फोर्ब्ज मॅगझीनने अरब देशांतील शंभर यशस्वी भारतीयांच्या प्रसिद्ध केलेल्या यादीत अल अदिल उद्योग समुहाचे प्रमुख, मसाला किंग धनंजय दातार यांना तिसावे स्थान मिळाले आहे. या यादीत मध्यपूर्वेतील शक्तिशाली व प्रभावी व्यावसायिकांचा समावेश आहे.

या निमित्त भारताचे संयुक्त अरब अमिरातीमधील राजदूत नवदीपसिंग सुरी व फोर्ब्जचे मध्यपूर्वेतील मुख्य संपादक खुलौद अल ओमियान यांच्या हस्ते दातार यांचा दुबई येथे सत्कार करण्यात आला. दातार यांचे पुत्र व अल अदिल उद्योग समूहाचे संचालक ऋषीकेश दातार यांचाही फोर्ब्जने प्रसिद्ध केलेल्या भावी नेत्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button