breaking-newsराष्ट्रिय

भारतात कोरोनावरील दुसऱ्या लसीलाही मानवी चाचणीस मान्यता

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असला तरी शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचेच फलश्रुत म्हणून आता देशात कोरोनावर निर्मित झालेल्या दुसऱ्या लसीच्या मानवी चाचणीला ‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) मान्यता दिली आहे. त्यामुळे देशासाठी हि दिलासादायक बाब आहे.

कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी इतर आघाडीचे देश प्रयत्न करत असतानाही भारतही यामध्ये आघाडीवर आहे. भारतात या आठवड्यात दोन लसी विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पहिली कोरोनावरील लस भारत बायोटेकनं COVAXIN तयार केल्याची घोषणा केली होती. आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी (एनआयव्ही) यांच्यासोबत मिळून त्यांनी यशस्वीरित्या भारतातील पहिली करोना लस तयार केली होती. त्यानंतर भारतातील ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं फेज 1 आणि फेज 2मानवी वैद्यकीय चाचण्या सुरू करण्यास परवानगी दिली.

दरम्यान, आता अहमदाबादची कंपनी झायडस कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीने कोरोनावरील ही दुसरी लस तयार केली आहे.‘ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) या लसीच्या फेज १ आणि फेज 2च्या मानवी चाचणीसाठी मान्यता दिली आहे. दरम्यान, ही मानवी चाचणी पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं म्हटलं जात आहे. या लसीची प्राण्यांवर यशस्वीरित्या चाचणी करण्यात आली आहे. याच आधारावर त्यांना पुढील फेजसाठी चाचणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.गेल्या पाच दिवसांमधील ही दुसरी लस आहे जिच्या मानवी चाचणीसाठी डीसीजीआयची मान्यता मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button