breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप खासदार हेमामालिनी, अभिनेते धर्मेंद्रसह कुटूंबियाच्या विरोधात पुणे कोर्टात दावा दाखल

पुणे |महाईन्यूज|

लोणावळा येथील १८० एकर जमिनीबाबत सामंजस्य करार (एमओयू) केला असताना, आता करार करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासह धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर तसेच, मुलगा अभिनेते सनी देओल, बॉबी देओल, मुली इशा आणि आहाना यांच्या विरूद्ध खासदार संजय काकडे यांनी पुण्यातील कोर्टात दावा दाखल केला आहे.

देओल कुटुंबाने ‘एमओयू्’प्रमाणे करार करण्याच्या मागणीसाठी हा दावा करण्यात आला असून, त्यावर दहा जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.

याबाबत खासदार काकडे म्हणाले,‘लोणावळा येथे ही जागा आहे. १८५ एकर जागेबाबत धर्मेंद्र, त्यांच्या दोन्ही पत्नी आणि मुलांसोबत ३१ मे २०१८ रोजी ‘एमओयू्’ करण्यात आला. त्यानुसार १०० एकर जागेत जे डब्ल्यू मॅरिएटचे रिर्सार्ट आणि ८५ एकर जागेत बंगले बांधून ते विकण्याचे ठरले होते. जे डब्ल्यू मॅरिएट रिर्सार्टमध्ये मिळणाऱ्या नफ्यातून प्रत्येकी ५० टक्के वाटा दोघांमध्ये घेण्याचे निश्चित करण्यात आले. बंगल्यांद्वारे येणाऱ्या उत्पन्नापैकी ३० टक्के देओल कुटुंब आणि ७० टक्के आमच्या कंपनीला मिळणार आहे. मात्र, याबाबतचा करार करण्यास देओल कुटुंबाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.

हा करार करण्याच्या मागणीसाठी पुण्यातील कोर्टात दावा दाखल केला आहे. दहा जानेवारीला त्यावर सुनावणी होणार आहे.’ ‘एमओयूप्रमाणे करार करावा, यासाठी धर्मेंद्र आणि अभिनेते खासदार बॉबी देओल यांच्याबरोबर अनेकदा बैठका झाल्या आहेत. मात्र, ‘एमओयू’प्रमाणे करार करण्याऐवजी त्यांच्याकडून कराराचे वेगवेगळे ड्राफ्ट देण्यात येत आहेत. त्यावरून त्यांना कोणीतरी दुसरी ऑफर केली असावी.’ असेही खासदार काकडे म्हणाले.

‘चित्रपटाच्या चित्रीकरणाचे कारण सांगून करार करण्यास विलंब लावण्यात आला. लोकसभेच्या निवडणुकीला सनी देओल हे उभे होते. ते कारण सांगून करार करण्यास टाळाटाळ करण्यात आली. आता ‘एमओयू’प्रमाणे देओल कुटुंबियांनी करार करावा, एवढीच मागणी आहे.’ असे खासदार काकडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button