breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

भाजप आमदाराच्या वाढदिवसाला सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन

वर्धा | कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र, वर्धामध्ये भाजपच्या आमदारानेच याला हरताळ फासत वाढदिवसाला मोठी गर्दी जमवल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नागरिकांना सहकार्य करत गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र, भाजपचे आर्वी येथील आमदार दादाराव केचे यांनी संचारबंदी आणि जमावबंदीचं उल्लंघन करत वाढदिवस साजरा केल्यानं सर्वच स्तरातून यावर टीका होत आहे.आमदार दादाराव केचे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकांना एकत्रित केलं.

यासाठी रिक्षा फिरवून धान्य वाटपाचीही घोषणा करण्यात आली. त्यानंतर धान्य वाटपच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पूर्णपणे भंग करण्यात आला. केचे यांच्या घरासमोर जमलेली गर्दी एखाद्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जमवलेल्या लोकांप्रमाणे भासत होती. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य आहे की नाही, असाच प्रश्न जाणकारांकडून विचारला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button