breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा-शिवसेना सत्तेच्या तिढ्यात, तर शरद पवार शेताच्या बांधावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची निवडणुकीनंतरची दिशा ठरलीही. पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी करण्यासाठी पवार राज्याच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी (एक नोव्हेंबर) ते शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी नाशिकमध्ये पोहचले. येथे द्राक्ष उत्पादकांची भेट घेत द्राक्ष बागांची पाहणी केली.

इगतपुरीजवळील टाके-घोटी गावांमधील शेतकऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. अगदी शेताच्या बांध्यावर जाऊन पवारांनी पावसाच्या पाण्यात वाहून गेलेल्या पिकांची पहाणी केली. ८० व्या वर्षीही पवार एखाद्या तरूण राजकारण्याला लाजवेल इतक्या उत्साहाने काम करत आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी वादळ-पावसाची तमा न बाळगता पवारांनी तरुणाच्या दमाने महाराष्ट्र पिंजून काढला. विशेष करून साताऱ्यातील पावसातील सभेनं विधानसभेतील चित्र पलटले. शरद पवार सध्या परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या मराठवाड्यात ते पाहणी दौरा करत आहेत. त्यांच्याबरोबर तरूण दमाचे धनंजय मुंडेसुद्धा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button