breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजपाने राज्यव्यापी आंदोलनात 100 रुपयात बोलावली गर्दी…पाण्याविना उन्हात बसायला सांगितलं…

पुणे | महाईन्यूज |

राज्यातील ठाकरे सरकारविरोधात भाजपाने मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन केलं होतं. पुण्यातही अशाप्रकारे भाजपाने आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला. पण या आंदोलनाला आणलेली गर्दी पैसे देऊन बोलवल्याचं समोर आलं. यातील बहुतांश लोकांना सरकारचा निषेध कशासाठी करतोय याची माहितीच नसल्याचं आढळून आलं. भाजपाने मात्र या आरोपाचं खंडन केले आहे. 

मंगळवारी राज्यव्यापी आंदोलनाची हाक भाजपानं दिली होती. राज्यभरात हे आंदोलन करण्यात आलं.  यामध्ये शेतकरी कर्जमाफी, महिलांवरील अत्याचार आणि मागील शासनाने घेतलेले निर्णय बदलणे यासारख्या अनेक मुद्द्यावरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. 
पुणे येथे जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व चौकात शहरातील ६ मतदारसंघातून कार्यकर्ते जमा झाले होते. या आंदोलनासाठी रस्त्याशेजारी छोटं व्यासपीठ बांधलं होतं, त्याच्यासमोर आंदोलकांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. गर्दीमुळे वाहतुकीला फटका बसू नये यासाठी मतदारसंघनिहाय गर्दीचं विभाजन केले होते. सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी सुरु होती. 

मात्र आपण नेमका निषेध कसला करतोय? याची माहिती नसल्याने गर्दीतली काही लोकं हतबल असल्याचं पाहायला मिळत होतं. यातील आंदोलक शहरातील विविध भागातून नगरसेवकांनी आणले होते. सिंहगड रोड येथील रहिवासी असलेल्या दीपाली पाटोळे आपल्या मुलांसह आंदोलनाला आल्या होत्या. एका इंग्रजी दैनिकाने तिच्याशी बातचीत केल्यानंतर तिने सांगितले की, आमच्या भागातील एका महिलेसोबत मी इथं आली आहे. आमचे नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी आम्हाला येथे येण्यासाठी सांगितले. म्हणून आम्ही आमच्या भागातील महिलांसोबत याठिकाणी आलो, यासाठी आम्हाला पैसे मिळतील असं सांगण्यात आलं. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button