breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भगवान केदारनाथ धामचे द्वार पुजेसाठी खुले, भाविकांना मात्र प्रवेश नाही

भगवान केदारनाथ धामचे द्वार काल म्हणजे 29 एप्रिलला खुले करण्यात आले. पुढच्या काही महिन्यांसाठी केदारनाथ धाम खुले राहणार आहे मात्र लॉकडाऊनच्या काळात भाविकांना  केदारनाथच्या दर्शनाची अनुमती देण्यात आलेली नाही. लॉकडाऊन सुरु असेपर्यंत येथे नियमावलींचे पालन करुन पूजाअर्चा होईल. काल सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी मंदिराची दार उघडण्यात आली. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारास फुलांच्या तोरणांची आरास करण्यात आली होती. 

कोरोना विषाणूच्या संकटानं देशाला वेढलं आहे सध्या केवळ देवस्थान बोर्डच्या 16 सदस्यांनाच पूजा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मंदिराची दारं खुली करण्यात आल्यानंतर अत्यंत साध्या पद्धतीनं येथे पूजा- अर्चा पार पडली. दरवर्षी मंदिरांची दारं खुली होताना केदारनाथ धाम परिसरात भाविकांची मोठी गर्दी असते, बम-बम भोलेच्या जयघोषात हा सगळा परिसर निनादून निघायचा मात्र पहिल्यांदाच हा परिसर मोकळा पहायला मिळाला.

कोरोना व्हायरसमुळे देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम चार धाम यात्रेवरही झाला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केदारनाथ मंदीराची दार उघडल्यानंतर भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. “11 वे ज्योतिर्लिंग भगवान केदारनाथ मंदिराची दारं उघडण्यात आली आहेत, तुमच्या साऱ्या मनोकामना पूर्ण होवोत तसेच भगवान केदारनाथ यांचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो, अशी मी  प्रार्थना करतो. बाबा सर्वांचे कोरोनाच्या संकटातून रक्षण करो” असं त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button