breaking-newsताज्या घडामोडीपुणे

ब्रिटिशकालीन पूल कोसळला

तळेगाव | महाईन्यूज |

तळेगावहून एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील आंबी येथील ब्रिटिशकालीन पूल आज पहाटेच्या सुमारास अचानक कोसळला गेला, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामुळे १५ गावांचा संपर्क तुटलेला आहे, अशी माहिती तेथील स्थानिकांनी दिलेली आहे. दरम्यान, पुलावरून अवजड वाहतुकीला बंदी असताना देखील वाहनचालक पुलावरून अवजड वाहतूक करतच होते.

या पुलावरील अवजड वाहतूक पाच वर्षांपासून बंद करण्यात आली होती. पुलाला धोकादायक पूल म्हणून देखील संबंधित प्रशासनाने जाहीर केलेले होते. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून मोठ्या वाहनांना वाहतुकीस मज्जाव करण्यात आला होता. हा ब्रिटिशकालीन पूल इंद्रायणी नदीवर शंभर वर्षणापूर्वी बांधण्यात आला होता असे ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button