क्रिडा

ब्राझीलच्या सरावात नेमार हेच आकर्षण…

फिफा विश्‍वचषक स्पर्धेसाठी सराव करीत असलेल्या ब्राझिलच्या संघाभोवती शेकडो फुटबॉलशौकिनांनी गर्दी केली होती. मात्र रशियन भूमीवरील पहिल्याच सराव सत्रासाठी जमलेल्या प्रेक्षकांकरिता नेमार हाच आकर्षणाचे केंद्र होता. शेकडो प्रेक्षकांनी नेमारच्या नावाचा घोष चालविल्यामुळे ब्राझिलच्या सरावात व्यत्ययही आला. त्यातील एका चाहत्याने सुरक्षा कडे तोडून नेमारपर्यंत धडक मारली आणि सेल्फीही मिळविला.

त्याआधी सराव सामन्यांत ऑस्ट्रियावर 3-0 असा विजय मिळविल्यामुळे उत्साहात असलेल्या ब्राझिलच्या खेळाडूंनी मध्यरक्षक फिलिप कुटिन्होचा 26वा वाढदिवस आगळ्या रीतीने साजरा केला. ब्राझिलच्या खेळाडूंनी कुटिन्होला जमिनीवर पाडून त्याच्या मस्तकावर अंडे फोडले आणि त्याचे अभिनंदन केले. ब्राझिळची विश्‍वचषक स्पर्धेतील सलामीची लढत येत्या रविवारी स्वित्झर्लंडविरुद्ध होणार आहे. त्यानंतर ई गटातील अन्य लढतीत ब्राझिलसमोर कोस्टा रिका व सर्बियाचे आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button