breaking-newsआंतरराष्टीय

ब्राझिलमधील तुरुंगात रक्तरंजित संघर्ष, १६ जणांचं धड वेगळं करण्यात आलं; ५७ जणांचा मृत्यू

ब्राझिलमधील तुरुंगात सोमवारी दोन गट आपापसांत भिडल्याने झालेल्या हिंसाचारात ५७ जणांचा मृत्यू झाला आहे. कारागृह प्रशाससनाने ही माहिती दिली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राजधानी बेलेमपासून जवळपास ८५० किमी दूर असणाऱ्या अल्टामीरा येथे जेलमध्ये जवळपास पाच तास हिंसाचार सुरु होता. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वेगवेगळ्या सरकारी तपास यंत्रणांनी संयुक्त प्रयत्न करत परिस्थितीवर नियंत्पण मिळवलं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात १६ जणांचं धड शरिरापासून वेगळं करण्यात आलं होतं. तर एका गटाकडून जेलमध्ये आग लावण्यात आल्याने गुदमरुन ४१ जणांचा मृत्यू झाला. प्रतिस्पर्धी गट संपवण्याच्या हेतूने हा हल्ला करण्यात आला होता अशी माहिती कारागृह प्रशासनाकडून देण्यात आली आहे. हा एक स्थानिक हल्ला होता. हल्लेखोरांनी सेलमध्ये प्रवेश करत कैद्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली आणि नंतर खोलीत आग लावली.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कारागृहातील एका कोपऱ्यात कैदी नाश्ता करण्यासाठी बसले असताना दुसऱ्या सेलमधून आलेल्या हल्लेखोरांनी जबरदस्ती घुसखोरी करत हल्ला केला. हल्ल्यादरम्यान दोघांना ओलीस ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. तर दोघांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्राझिलच्या कारागृहांमध्ये कैद्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त असून हा सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button