breaking-newsमनोरंजन

बॉलीवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील दोन गावे घेतली दत्तक

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, अनेक बॉलीवुड कलाकारांनी गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचप्रमाणे आपल्या जन्मदिनी (11 ऑगस्ट), जॅकलीन फर्नांडीसने महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील दोन गावे, पाथर्डी आणि सकुर दत्तक घेतली आहेत. तीन वर्षांच्या या परियोजनेदरम्यान या गावातील कुपोषित गावकऱ्यांना जेवण पुरवण्यात येणार आहे. यासाठी जॅकलिनने आपल्या या पालघर प्रोजेक्ट्साठी ‘ऍक्शन अगेन्स्ट हंगर फाऊंडेशन’सोबत करार केला आहे.

याविषयी बोलताना जॅकलीन म्हणाली की, ‘सध्या सुरू असलेल्या या महामारीमुळे सर्वांसाठी हे वर्ष कष्टमय राहिले आहे. आपल्या समाजातील एक वर्ग जीवनावश्यक गरजांसाठी देखील संघर्ष करतो आहे.”

दोन गांवांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाविषयी बोलताना जॅकलिन म्हणाली की, “यातून जवळपास 1,550 लोकांपर्यंत पोहोचता येणार असून गावकरी ज्यांमध्ये लहान मुलांचा देखील समावेश असेल, त्यांच्या कुपोषणाची तपासणी केली जाईल. कुपोषणाविषयी जागरूकता सत्र देखील आयोजित करण्यात येणार आहेत. आम्ही 150 महिलांची, त्यांच्या नवजात बाळांची देखभाल करणे आणि त्यांना सक्षम बनविण्यासाठी जागरूकता वाढवण्यासोबतच सात फ्रंटलाइन श्रमिकांना प्रशिक्षण आणि नोकरीकरिता सहाय्य करण्यात येईल. गावातील 20 परिवारांचे आरोग्य ट्रॅक करण्याची आमची योजना आहे, ज्यांना कुपोषण दूर करण्याची साधने उपलब्ध करून देण्यात येतील आणि 20 महिलांना गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत सहाय्य देण्यात येईल आणि ते निरोगी राहतील, हे पाहिले जाईल. सोबतच, 20 मुलांच्या कुपोषणावर इलाज करण्यात येईल आणि गावांमध्ये 20 स्वयंपाक आंगण स्थापण्यात येईल. हे समाजाच्या उपयोगी येणे माझ्या आई वडिलांनी मला शिकवले आहे आणि माझ्या या निर्णयाचे त्यांनी ठाम समर्थन केले आहे.”

मुंबईमधील अनलॉक मोडसोबतच चित्रपट उद्योग हळू हळू पूर्वपदावर येत आहे. आपल्या आगामी कामच्या शेड्यूलविषयी बोलताना, जॅकलीन सांगते की, “आम्ही ‘अटॅक’च्या प्री-प्रोडक्शनच्या कामाला सुरुवात केली आहे. काम पूर्ववत सुरू होण्यासाठी आणखी काही वेळ लागेल, कारण सर्वजण या नव्या सामान्यपणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करात आहेत, लवकरच ते होईल अशी आशा आहे.”

जॅकलिन आगामी चित्रपटात जॉन अब्राहम सोबत दिसणार आहे, याआधी ‘हाउसफुल 2’, ‘रेस 2’ आणि ‘ढिशूम’सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. यासोबतच ती ‘किक’ फ्रैंचाइज़ीच्या दूसऱ्या भागामध्ये देखील ती असणार आहे, ज्याची घोषणा लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button