breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या गळाला लागले बडे मासे

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात चौकशी करत असताना बॉलिवूडमधील ड्रग्सचे प्रकरण समोर आल्याने या प्रकरणात आता नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरू असून आतापर्यंत अनेक बडे मासे एनसीबीच्या गळाला लागले आहेत. तसेच, ड्रग्स प्रकरणात कोठडीत असलेल्या तीन आरोपींच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर, बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात NCB च्या रडारवर आहे. ड्रग्ज प्रकरणात NCB ने 6 आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. यापैकी 3 आरोपींच्या जामीन अर्जावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. सॅम्युअल मिरांडा, अब्दुल बासित परिहार, दीपेश सावंत या तिघांच्या जामीनावर आज सुनावणी होणार आहे.

ड्रग्ज प्रकरणातील सर्व सहा आरोपी मुंबईतील भायखळा कारागृहात आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही सुद्धा याच कारागृहात आहे. मिरांडा, अब्दुल आणि दीपेश सावंत यांचा जामीन अर्ज यापूर्वी सत्र न्यायालयाने फेटाळला होता. आता मुंबई हायकोर्ट यांचा जामीन मंजूर करतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सॅम्युअल मिरांडा हा सुशांतचा स्टाफ मॅनेजर होता. सुशांतची मैत्रिण अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती या दोघांची सॅम्युअल मिरांडा सोबतची चॅट चौकशीदरम्यान समोर आली होती. तर बासित हा एक ड्रग्स पेडलर किंवा ड्रग तस्कर आहे. दीपेश सावंत हासुद्धा सुशांतचा स्टाफ मेंबर आहे. रिया चक्रवर्तीचा जामीन दोन वेळा फेटाळला आहे. त्यामुळे तिला येत्या 22 सप्टेंबरपर्यंत भायखळाच्या तुरुंगात रहावे लागणार आहे.

सॅम्युअलचं ड्रगबाबत रिया आणि शौविकसोबतचं चॅटिंग समोर आलं होतं.बासितने अनेकांना ड्रग पुरवल्याचा आरोप आहे. NCB ने शोविक आणि रियासोबतच्या संपर्कानंतर त्याला ताब्यात घेतलं.

NCB च्या गळाला बडा मासा
दरम्यान सुशांत सिंग ड्रग्स प्रकरणात अटक आरोपी अंकुश अरनेजा याच्या चौकशीत महत्वाची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी राहील रफत विश्राम उर्फ सॅम याला अटक केली.

सॅम यांच्याकडून 928 ग्रॅम चरस जप्त करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे 4 लाख 36 हजार रुपये ही जप्त करण्यात आले आहेत. सॅम हा फिल्म क्षेत्रातील अनेकांना ड्रग्स देत असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button