breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

तिवरे गावठाणाला दरडींचा धोका कायम

रत्नागिरी |

सुमारे दोन वर्षांपूर्वी धरणफुटीमुळे मोठी जीवित व वित्त हानी सोसावी लागलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील दोन वाडय़ांच्या मधल्या भागातून दरड कोसळल्याचा प्रकार पुढे आला असून येथील सुमारे ५० कुटुंबे भितीच्या छायेखाली वावरत आहेत. गेल्या आठवडय़ात सर्वत्र अतिवृष्टी होत असताना २२ जुलै रोजी तिवरे गावठाण व गंगेची वाडी दरम्यान मोठी दरड कोसळून खाली आली. येथील ग्रामस्थांचे नशिब बलवत्तर म्हणून या दरडीखाली एकही घर आले नाही. पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर, माती, दगड-गोटे आणि मोठी झाडेही खाली वाहत आली. तिवरे गावठाणामधून आलेली ही दरड पुढे गणपती विसर्जन घाटापर्यत गेली आहे. यावेळी मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. शिवाय, पाठीमागच्या डोंगरालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्याने ग्रामस्थ रात्री जवळच्या गणपती मंदिरात झोपण्यासाठी जात आहेत. या ठिकाणी पन्नासहून जास्त कुटुंबे वास्तव्याला आहेत.

दोन वाडय़ांच्या मधून घरालगत ही दरड खाली आल्यामुळे कुणीही जखमी झाले नाही. दोन वर्षांपूर्वी या गावाच्या उशाशी असलेले धरण फुटल्याच्या धक्कय़ातून येथील कुटुंबे अजूनही सावरलेली नाहीत. त्यात या डोंगराची एक बाजू खाली आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखी भितीचे वातावरण तयार झाले आहे. तिवरे गावठाणकडे जाणारा रस्ताही चिखलाखाली गेला आहे. जवळच्या रिक्टोली इंदापूर या वाडीलगतच्या डोंगरालाही भेगा गेल्या असून, येथील सत्तर ते ऐंशी कुटुंबियांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तिवडी या गावी जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटला असून रस्ताही वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला आहे. दसपटीतील रामवरदायिनी मंदिरानजीक असणारा पूलही धोकादायक बनला आहे. गेल्या चार दिवसात प्रशासनाचा एकही माणूस न फिरकल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली . सोमवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने घटनेची पाहणी केली. या ठिकाणी भूवैज्ञानिक जाऊन पाहणी करणार आहेत. गेल्या आठवडय़ात सर्वत्र अतिवृष्टी होत असताना २२ जुलै रोजी तिवरे गावठाण व गंगेची वाडी दरम्यान मोठी दरड कोसळून खाली आली. येथील ग्रामस्थांचे नशिब बलवत्तर म्हणून या दरडीखाली एकही घर आले नाही. पण पाण्याच्या प्रवाहाबरोबर, माती, दगड-गोटे आणि मोठी झाडेही खाली वाहत आली.

तिवरे गावठाणामधून आलेली ही दरड पुढे गणपती विसर्जन घाटापर्यत गेली आहे. यावेळी मोठा आवाज झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. शिवाय, पाठीमागच्या डोंगरालाही अनेक ठिकाणी भेगा गेल्याने ग्रामस्थ रात्री जवळच्या गणपती मंदिरात झोपण्यासाठी जात आहेत. या ठिकाणी पन्नासहून जास्त कुटुंबे वास्तव्याला आहेत. दोन वाडय़ांच्या मधून घरालगत ही दरड खाली आल्यामुळे कुणीही जखमी झाले नाही. दोन वर्षांपूर्वी या गावाच्या उशाशी असलेले धरण फुटल्याच्या धक्कय़ातून येथील कुटुंबे अजूनही सावरलेली नाहीत. त्यात या डोंगराची एक बाजू खाली आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये आणखी भितीचे वातावरण तयार झाले आहे. तिवरे गावठाणकडे जाणारा रस्ताही चिखलाखाली गेला आहे. जवळच्या रिक्टोली इंदापूर या वाडीलगतच्या डोंगरालाही भेगा गेल्या असून, येथील सत्तर ते ऐंशी कुटुंबियांना जवळच्या शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे. तिवडी या गावी जाणाऱ्या रस्त्यावरील पूल तुटला असून रस्ताही वाहून गेल्याने येथील संपर्क तुटला आहे. दसपटीतील रामवरदायिनी मंदिरानजीक असणारा पूलही धोकादायक बनला आहे. गेल्या चार दिवसात प्रशासनाचा एकही माणूस न फिरकल्याने या ठिकाणी ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली . सोमवारी घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेने घटनेची पाहणी केली. या ठिकाणी भूवैज्ञानिक जाऊन पाहणी करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button