breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बेकायदा पिस्तुल विक्रीचा धंदा करणा-या “लेबर सप्लायर”ला ठोकल्या बेड्या

  • सात पिस्तुल, 15 काडतुसे जप्त
  • गुन्हे शाखेची कारवाई

पिंपरी – बेकायदेशीर पिस्तूल बळगून त्याची विक्री करणा-या एका उच्चशिक्षीत तरुणाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्या ताब्यातून 4 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 8 जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. त्याच्याकडून पिस्तुल विकत घेणा-या एका हॉटेल व्यवसायिकाच्याही मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून देखील दोन पिस्तूल आणि तीन काडतुसे असा एकूण 1 लाख 97 हजार 500 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला, अशी माहिती गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी बुधवारी (दि. 29) पत्रकार परिषदेत दिली.

 

आरोपी अनुप नवनाथ सोनवणे (वय 28, रा. प्रेरणा बिल्डींग, अंकुश चौक, ओटा स्कीम, निगडी, मूळ रा. मु. पो. डोंगर किनी, ता. पाटोदा, जि. बीड) हा पिस्तूल व काडतुसे बेकायदेशीर विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना सुत्राद्वारे मिळाली. त्यावर तातडीने नाईकवाडी यांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी सोनवणे याच्या घरावर छापा टाकला. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली. त्याने विक्रीसाठी पिस्तुल आणल्याचे कबुल केले. त्यावर पोलिसांनी तो रहात असलेल्या घराची झाडाझडती घेतली. यात 4 देशी बनावटीचे पिस्तुल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

 

अधिक तपासात त्याने अन्य दोन पिस्तुल आणि 11 काडतुसे मोशी प्राधिकरणातील चांदणी हॉटेलच्या मालकाला विकल्याचे समोर आले. त्यावर हॉटेल मालक अवधुत जालिंदर गाढवे (वय 26, रा. स्पाईन रोड, सेक्टर 6, डायमंड रेसिडेन्सी, बी. 6, मोशी प्राधिकरण, मुळगाव गाढवेमळा, ओतुर, ता. जुन्नर) याला आळंदी भागातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने विकत घेतलेले 2 पिस्तुल आणि 3 काडतुसे पोलिसांच्या ताब्यात दिली. अन्य एका पिस्तुलची विचारणा केली असता त्याने खडकीतील त्याच्या राहत्या घरातून एक पिस्तुल आणि 4 काडतुसे काढून दिली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील करत आहेत. सहायक आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक नाईकवाडी, निरीक्षक गणेश पाटील, दीपाली मरळे, हवालदार प्रमोद वेताळ, कैलास बाबडे, प्रमोद लांडे, राजेंद्र शेटे, प्रविण दळे, राजेश परंडवाल आदींनी कारवाईसाठी सहकार्य केले.

 

केळगावच्या नदीकाठावर झाडल्या 8 गोळ्या

अनुप सोनवणे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात खडक, सांगवी, निगडी, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. त्याचे शिक्षण डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनियरिंग झाले आहे. बेरोजगार असल्यामुळे तो लेबर सप्लायर म्हणून काम करतो. उच्चशिक्षीत असुन देखील तो गुन्हेगारी कृत्याकडे वळल्याने विद्यार्थी दशेतील तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्याकडून पिस्तुल आणि काडतुसे विकत घेणारा अवधुत गाढवे हा इयत्ता बारावी पास असून तो हॉटेल व्यवसायिक आहे. त्याने सोनवणे याच्याकडून तीन पिस्तुल आणि 11 काडतुसे विकत घेतली होती. मात्र, त्याला पिस्तुल चालवण्याची कला अवगत नव्हती. त्याचा सराव करण्यासाठी त्याने केळगाव येथील नदीकाठी 8 काडतुसे हवेत फायर केल्याची कबुली त्याने दिली. या गुन्ह्यात तो दिघी पोलिसांच्या तावडीतून सुटका करून घेत 1 जुलै 2018 पासून फरार होता.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button