breaking-newsराष्ट्रिय

बेकायदा अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या दीडशे जणांची भारतात पाठवणी

‘अमेरिकी स्वप्न’ (अमेरिकन ड्रीम) साकारण्यासाठी गेलेल्या १५० भारतीयांची परतपाठवणी करण्यात आली आहे. हे लोक बेकायदा अमेरिकेत गेले होते, त्यांचे बुधवारी येथील विमानतळावर आगमन झाले.  हे लोक एकामागोमाग एक विमानतळावरून बाहेर पडत असताना त्यांच्या चेहऱ्यावर खिन्नतेचे भाव होते. अमेरिकी स्वप्न साकारता न आल्याने निराश झाल्याचे त्यांनी बोलून दाखवले. पंजाबमधील भटिंडा येथील सिंग जबरजंग यांनी सांगितले की, मी अमेरिकेत जाण्याचा हा चौथा प्रयत्न केला. पण मला तेथून परत पाठवण्यात आले. १५ मे रोजी मी विमानात बसलो नंतर मॉस्को, पॅरिस मार्गे मेक्सिकोत गेलो तेथून कॅलिफोर्नियात जाण्याचा प्रयत्न १६ मे रोजी केला पण पोलिसांनी पकडले नंतर अ‍ॅरिझोनात ठेवले व परतपाठवणी केली. या चार प्रयत्नांत प्रवासावर २४ लाख खर्च झाले तर इतर मध्यस्थांना ४० लाख रुपये दिले होते. लखिवदर सिंग याने सांगितले की, अमृतसर येथील एजंटला अमेरिकेत प्रवेश मिळवून देण्यासाठी २५ लाख रुपये दिले होते. त्याने २ मे रोजी मॉस्को व पॅरिस मार्गे मेक्सिकोत पाठवले. तेथे सीमा ओलांडताना पकडला गेलो तेथून अ‍ॅरिझोनात नेण्यात आले व आता परतपाठवणी करण्यात आली.

बेकायदा अमेरिकेत घुसखोरी करणाऱ्या १५० भारतीयांना घेऊन खास विमान दिल्ली विमानतळावर सकाळी सहा वाजता दाखल झाले. ते बांगलादेशमार्गे आले. त्यानंतर स्थलांतर अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button