breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘..तेव्हा मंडल आयोगाची चूक झाली’; मराठा आरक्षणावर उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य

Udayanraje Bhosale | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यातच आता मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, त्या काळात मोठी चूक झाली. मंडल आयोगासह इतरांकडून एक चूक झाली. केवळ मागासवर्गालाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गालाही आरक्षण द्यायला हवं होतं. कोणीही, कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्या व्यक्तीला आरक्षण मिळायला हवं. परंतु, त्यांना आरक्षण नाही. या आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करणं हा विचार त्यावेळी करायला हवा होता आणि तो आरक्षणाच्या माध्यातून मांडायला हवा होता.

हेही वाचा     –     शिवजन्मोत्सव सोहळा | जाणून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. तशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घोषणा केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button