breaking-newsपुणे

“बीआरटी’ मार्गातून आता एसटी बसही धावणार

पुणे – महापालिका हद्दीतील “बीआरटी’ मार्गांच्या प्रभावी वापरासाठी या मार्गाचा एसटी बसला वापर करण्यास परवानगीचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे या “बीआरटी’ मार्गांतून आता पीएमपीसोबतच एसटीही धावणार आहे.

महापालिकेने जलद वाहतूक सेवेसाठी 2007 पासून शहरातील प्रमुख रस्त्यांवर “बीआरटी’ मार्ग उभारले. त्यात सातारा रस्ता, नगर रस्ता, सोलापूर रस्ता, जुना पुणे- मुंबई रस्ता, औंध रस्ता यांचा समावेश आहे. या मार्गावर “बीआरटी’साठीची स्वतंत्र लेन असल्याने त्यातून फक्‍त पीएमपी बसेस धावण्यास परवानगी आहे. तर इतर बसेसनी या मार्गांतून प्रवेश केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते. तसेच इतर वाहने या मार्गामधून जाऊ नयेत, यासाठी या मार्गाच्या सुरुवातीला बॅरिकेड आणि ट्रॅफिक वॉर्डन आहेत. गेल्या दोन वर्षांपासून या “बीआरटी’ मार्गाचा वापर एसटीला करण्यास परवागनी द्यावी, अशी मागणी पालिकेकडे एसटीने केली होती. सुरुवातीला प्रशासनाने त्यास नकार दिला होता. मात्र, पुन्हा या मार्गांचा प्रभावी वापर आणि बीआरटीच्या कडेच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

…म्हणून देण्यात आली परवानगी
स्वारगेट, पुणेस्टेशन आणि शिवाजीनगर ही महत्त्वाची बसस्थानके असून तेथून विदर्भ, मराठवाडा, तसेच सांगली, सातारा कोल्हापूर, कोकणाकडे जाणाऱ्या प्रमुख बसेसच्या फेऱ्या होतात. या एसटी बस पुण्याच्या वेशीवर वेळेत आल्या, तरी त्यांना स्थानकापर्यंत पोहचण्यास सुमारे दीड ते 2 तास लागतात, तसेच बाहेर पडण्यासही तेवढाच वेळ लागतो. त्यातच “बीआरटी’ मार्गांच्या बाजूचे रस्ते अरुंद असल्याने या बसेसमुळे आणखी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे किमान एसटी बसेस “बीआरटी’ मार्गातून गेल्यास वाहतूक कोंडी कमी होईल. तसेच सध्या “बीआरटी’ मार्गांतील बसेसची वारंवारता कमी असल्याने या मार्गांचा वापर तुलनेने कमी क्षमतेने होतो. त्यामुळे एसटी बसलाही हा मार्ग वापरण्यास मुभा दिल्याचे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button