breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार विराजमान, सातव्यांदा घेतली शपथ

पाटणा – बिहारमधील सत्तानाट्य संपले असून अखेर आज नितीश कुमार यांनी सातव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ते सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. पाटण्यातील राजभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल फागू चौहान यांनी त्यांना शपथ दिली. या सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि भाजपाचे बिहारचे प्रभारी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

नितीशकुमार यांच्यासोबत भाजपाचे नेते तारकिशोर प्रसाद आणि रेणू देवी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. बिहारच्या राजकारणात दोन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता वर्तवली जात होती.

शपथविधीपूर्वी काल नितीश कुमार यांनी आपली मुख्यमंत्री होण्याची इच्छा नव्हती, असं विधान केल्याने ते चर्चेत आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button