breaking-news

बिबटय़ास पाहून घाबरलेल्या महिलेचा हृदयविकाराने मृत्यू

संगमनेर | महाईन्यूज

अचानकपणे समोर उभा ठाकलेला बिबटय़ा बघून घाबरलेल्या एका महिलेला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. शहराजवळ असलेल्या जाखुरी गावात ही घटना घडली. शीलाबाई लहानु पानसरे (वय ४८) असे या महिलेचे नाव आहे.शीलाबाई पानसरे ही महिला शनिवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान आपल्या शेतामध्ये काम करत असताना अचानक तिच्यासमोर बिबटय़ा प्रकट झाला. समोर उभा ठाकलेल्या बिबटय़ा बघतात शीलाबाई पानसरे यांची मोठी धावपळ उडाली. अत्यंत भेदरलेल्या शीलाबाई यांना तेथेच हृदयविकाराचा झटका आला. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिलेला आहे.

  • शनिवारी घडलेल्या प्रकाराची माहिती तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच संगमनेर भाग १ चे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे, वनरक्षक एस. आर. पाटोळे यांच्यासह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी करत वनविभागावर आपला संताप व्यक्त केला आहे. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालत मयताच्या कुटुबीयांना वनविभागाकडून मदत मिळण्याची मागणी केली. शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून मृत महिलेचा अंगावर कोणतीही जखम दिसली नसल्याचे सांगण्यात आले. वनविभागाकडून बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झाले किंवा मृत्यू झाला तरच मदत मिळते असे वनक्षेत्रपाल नीलेश आखाडे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button