breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बाळासाहेब थोरात, चव्हाण आज मुख्यमंत्र्यांना भेटणार

मुंबई | काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे ज्येष्ठ मंत्री सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. सरकारमध्ये आपला योग्य सन्मान राखला जात नसल्याबाबतची नाराजी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन व्यक्त करणार आहेत.  विधान परिषदेच्या १२ जागांच्या निवडीच्या तोंडावर काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांची नाराजी म्हणजे विधान परिषदेच्या जागावाटपासंदर्भातले दबावतंत्र आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. ४४ आमदार असलेल्या काँग्रेसला सरकारमध्ये दुय्यम वागणूक मिळते आहे. मात्र, काँग्रेसचा खरा रोख मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याविरुद्ध आहे. काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यांसाठी पसंतीचे सचिव मिळत नाहीत हे त्यांचे मूळ दुखणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button