breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

बापरे! मुंबईकरांना कोरोना होऊनही गेला आणि बराही झाला; तरी मुंबईकरांना समजलंही नाही

कोरोनाचा प्रसार हा सर्वात जास्त वाढत चालाल आहे तो महाराष्ट्रात त्यातही मुंबई आणि पुण्यात तर जास्त.पण आता मुंबईतील कोरोनाचं प्रमाण थोड्याफार प्रमाणात आटोक्यात आल्याचं म्हटलं जातय… अशातचं एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्तापर्यंत अनेक लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता मुंबईतील एका खाजगी लॅबने अहवालातून वर्तवली आहे.

लाखो मुंबईकरांना कोरोना होऊन बराही झाला आहे, आणि चक्क मुंबईकरांना ते समजलही नाही असं सांगण्यात येत आहे. मुंबईत एका खाजगी लॅबने कोरोना बाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. खाजगी थायरोकेयर लॅब बरोबरच Sero Surve या अधिकृत संस्थेने ही मुंबईतील काही विभागांमध्ये कोरोना संदर्भात दहा हजार लोकांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. मात्र, त्याचे संख्यात्मक विश्लेषण येत्या दोन दिवसातच स्पष्ट होणार आहे.

संपुर्ण देशा मधील नागरीकांना कोरोनाची लागन होवू नये म्हणून प्रत्येकजण आपआपली काळजी घेत आहेत. यामध्ये ज्या व्यक्तींनी कोविडची चाचणी केलेली आहे, अश्या नागरीकांना कोरोनाची लागन झाल्याचं स्पष्ट होत होतं. त्यानंतर त्या व्यक्तीला कोणता त्रास झाला तर त्याचे गंभीर स्वरुपही आपल्याला पाहायला मिळत आहेत. अश्यात जे संक्रमित रुग्ण आहेत त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना देखील कोरोनाची लागण झाली असेल असा सुध्दा समज सर्वसामान्यांमध्ये आहे. ज्यांची चाचणी पॉझिटिव्ह आलीये. पण कोणतीही लक्षणं नाहीत अशांची संख्या सुद्धा एका बाजूला वाढत आहे.

ज्या नागरिकांनी अद्यापही कोरोनाची चाचणी केलेली नाही, अशा नागरिकांच्या शरीरात सध्या अँटीबॉडीज तयार होताना दिसत आहेत. मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर कोरोना होऊन आपोआप बराही झाला असून मुंबईकरांना कोरोना झाल्याचं कळलंही नाही, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. एका खासगी लॅबमध्ये सुरू असलेल्या अँटिबॉडी टेस्टमध्ये हा खुलासा झाल्याचं उघड झालं आहे. या खासगी लॅबमध्ये काही लोकांची तपासणी केली असता त्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे या लोकांना कोरोना झाला असल्याचं सिद्ध होत असून धक्कादायक म्हणजे कोरोना झाल्याचं त्यांना कळले सुद्धा नाहीये.

थायरोकेअर लॅबचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. आरोक्या स्वामी वेलुमानी यांनी देशभरात 18 कोटी लोकांना कोरोना होऊन गेला असल्याची शक्यता वर्तवली आहे. थायरोकेयरच्या वतीने भारतातील सहाशे ठिकाणाहून 60 हजाराहून अधिक सॅम्पल्स तपासली गेली आहेत. यामधून 15 टक्के लोकांना कोरोनाची लागण होऊन गेलेली आहे, आणि त्यातून ते आपोआप बरेही झाल्याचा निष्कर्ष काढला आहे. आय.सी.एम.आरच्या परवानगी नंतर सरकारी प्रयोगशाळा बरोबरच खाजगी प्रयोगशाळांनी एका महिन्यात केलेल्या निरीक्षणातील हा अहवाल असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button