breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य, दुसरा हप्ता मंजूर

मुंबई | नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १० लाख बांधकांम कामगारांना लाभ मिळणार आहे. आता आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केले आहे. याबाबत दुसराही हप्ता मंजूर करण्यात आला आहे.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी तीन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

कोविड -१९ या विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत दोन हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button